Mizoram On High Alert : नवी दिल्ली : मिझोराममध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काही बंडखोरांच्या गटाने भारत-म्यानमार सीमेवर तळ ठोकला होता. ज्यांवर म्यानमारच्या हवाई दलाने हल्ला केला आहे. सद्या म्यानमारमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. म्यानमारच्या लष्कराला बंडखोर गट सातत्याने आव्हान देत आहेत. म्यानमारमध्ये लष्करी राजवट आहे. हे बंडखोर लष्करी राजवटीला सातत्याने आव्हान देत आहेत.
म्यानमारमध्ये 2021 च्या सत्तापालटानंतर लष्करी राजवटी लागू झाली. म्यानमारच्या सीमेजवळील उत्तरेकडील राज्यात याआधी भीषण चकमक ही झाली होती. सरकारविरोधी बंडखोरांनी 100 लष्करी चौक्यांवर कब्जा केला आहे. सरकार मुख्य सीमा क्रॉसिंगवर नियंत्रण गमावत आहे. जे जवळजवळ सर्व सीमापार व्यापाराला परवानगी देते. चीनने बंडखोरांना आणि लष्कराला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. चीनने म्यानमारच्या दुर्गम भागात अब्जावधी डॉलर्सची ऊर्जा पायाभूत सुविधांची गुंतवणूक केली आहे.
90,000 लोकांचे स्थलांतर
वाढत्या तणावामुळे सुमारे 90,000 लोक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांने माहिती दिली की, शान राज्यात सुमारे 50,000 लोक विस्थापित झाले आहेत, जेथे गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू आहेत आणि काही चीनमध्ये गेले आहेत. शेजारच्या सागिंग प्रदेश आणि काचिनमध्ये संघर्षांमुळे 40,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.