Mizoram Election Result: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने मिझोराम निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलली आहे. आता राज्याच्या निवडणुकांचे निकाल 4 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी लागणार आहेत. यापूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांसह मिझोरामचे निकाल रविवारी 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार होते. मिझोराममध्ये या संदर्भात अनेक लोकांकडून विनंती आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
खरे तर, मतदानापूर्वीच मिझोरममध्ये मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाले. ते म्हणाले की, रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असलेल्या मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलण्यात यावी. भाजप, काँग्रेस आणि सत्ताधारी एमएनएफसह सर्व राजकीय पक्षांनी ही मागणी मान्य केली.
Date of counting for #MizoramElections2023 has been changed from Sunday to Monday
Details here: https://t.co/XeEKklerRn— Spokesperson ECI (@SpokespersonECI) December 1, 2023