स्वित्झर्लंड : माजी मिस स्वित्झर्लंडची फायनलिस्ट क्रिस्टीनाची हत्या तिच्या पतीने केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. क्रिस्टीना जोक्सिमोविच हिची हत्या बासेलजवळील बिनिंगेनमध्ये केली आहे.
थॉमस असे आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती थॉमसने क्रिस्टीनाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. नंतर त्याने यापैकी बरेच तुकडे ब्लेंडरमध्ये दळले. ते लपवण्यासाठी त्याने द्रावणात अॅसिड मिसळले होते. मात्र पोलीसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. अखेर पोलीसांनी त्याला पकडले, जिथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र चौकशीदरम्यान त्याने पोलीसांना ते सांगितले. त्यामुळे पोलीसही आश्चर्यचकीत झाले. त्याचवेळी त्याने हेही सांगितले की, त्याने स्वसंरक्षणार्थ आपल्या पत्नीची हत्या केली आणि तिच्या मृत्यूने तो घाबरला, म्हणून त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आहे.
एका रिपोर्टनुसार, फेब्रुवारीमध्ये 38 वर्षीय मॉडेल जोक्सिमोविकचा विकृत मृतदेह सापडल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. अधिका-यांनी तपास सुरु केला आणि ताबडतोब असा निष्कर्ष काढला की तिचे तुकडे करण्यापूर्वी तिचा गळा दाबला गेला होता. या गुन्ह्यात पोलीसांनी थॉमसला ताब्यात घेतले होते. त्याचवेळी थॉमसने कोर्टाकडे जामिनाची मागणी केली होती, ती फेडरल कोर्टाने फेटाळली आहे.