लखनऊ: लखनऊमधील बीबीडी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीचा कॉलेज स्टाफमध्ये काम करणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटरने विनयभंग केला. तो विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून घाणेरडे काम करायचा. तो विद्यार्थिनीला बेडवर भेट, तुझे मार्क्स वाढवून देईल, असे म्हणायचा. तू सहमत नसेल, तर मी तुला नापास करीन. सध्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संगणक ऑपरेटरला अटक केली आहे.
हे प्रकरण बीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोयल कॉलेजमधील आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत विद्यार्थिनीने म्हटले आहे की, ती फैजाबाद रोडवरील स्काय व्हिला अपार्टमेंटमध्ये राहते. निखिल मिश्रा हा गोयल कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. गेल्या एक महिन्यापासून निखिल तिचा मानसिक छळ करत होता. तो तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावून वाईटरित्या स्पर्श करतो आणि तिचा मोबाईल देखील हिसकावून घेतो.
विद्यार्थिनीने तिच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, 28 ऑगस्ट रोजी निखिलने तिला आपल्या कार्यालयात बोलावले. यानंतर त्याने चुकीच्या पद्धतीने तिचा हात पकडून तपासणी सुरू केली. तसेच तिचा मोबाईल हिसकावून घेतला. याला विरोध केला असता, मार्क आणि अटेंडन्स वाढवायची असेल, तर त्याच्यासोबत झोपायला यावे लागेल, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर एके दिवशी निखिल तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला आणि तिला खोलीत चलण्यास सांगितले. तिने कसे तरी निखिलला तिच्या घरातून पळवून लावले.
आरोपी संगणक ऑपरेटरला अटक
त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी निखिलने विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावले आणि मी उद्या तुझ्या खोलीत येईन, असे सांगितले. तुला चांगल्या मार्कांनी पास व्हायचे असेल, तर मला तुझ्या खोलीच्या बेडवर तयार भेट. यानंतर दुसऱ्या दिवशी तो अपार्टमेंटच्या खाली आला आणि तिला खोलीत चलण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थिनीने आरडाओरड केली असता तिथे लोक जमा झाले. यानंतर 1090 वर कॉल करत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला बीबीडी पोलीस ठाण्यात नेले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संगणक ऑपरेटर निखिलला अटक केली.