नवी दिल्ली: रशियामध्ये काम करताना फसवणूक झालेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा भारत सरकारने जोरदारपणे उचलून धरला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, सुमारे 20 भारतीयांनी रशियामधून आमच्याशी संपर्क साधला आहे, ज्यांना भारतात परतायचे आहे. कारण या मानवी तस्करी रॅकेटमध्ये त्यांची फसवणूक झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘त्यांना खोटे आणि कटकारस्थान करून तिकडे घेऊन गेले आहेत. मानवी तस्करीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी सीबीआयने काही छापे टाकले आहेत. आम्ही जनतेला अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करतो.