Chile Wildfires : दक्षिण अमेरिकेतील चिली येथील जंगलात शनिवारी (३ फेब्रुवारी) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. या दुर्घटनेत आत्तापर्यंत जंगल परिसरातील ४६ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, ११०० हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत.
आगीच्या दुर्घटनेनंतर तत्काळ प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ९२ जंगलं या आगीच्या तडाख्यात सापडली असल्याची माहिती चिलीचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री कैरोलिना टाहो यांनी दिली आहे. दरम्यान, आगीतील मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अजूनही जंगलातील काही भागात आगीच्या ज्वाला धुमसत आहेत. आगीबाबत माहिती देताना कॅरोलिना तोहा म्हणाले, देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात असलेल्या जंगलांना शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आग जंगलातील जवळपास ४३ हजार हेक्टरवर पसरली. यामुळे लोकवस्तीत राहणाऱ्या अनेक नागरिकांची घरे जळून खाक झाली आहेत. सुरुवातील काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य न झाल्याने लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडवे लागले.
आतापर्यंत ४० नागरिकांचा मृत्यू
या आगीत आतापर्यंत ४० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. तर हजारो लोकांची घरे जळून खाक झाली आहेत. आमच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत असल्यामुळे लोकांच्या घरावर आणि सुविधांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. असंही कॅरोलिना तोहा म्हणाले.
At least 46 people were killed in forest fires in central Chile, reports Reuters
— ANI (@ANI) February 4, 2024