मणिपूर : गेल्या वर्षभरापासून धगधगत असलेल्या मणिपूर पुन्हा एकदा हिंसेच्या दिशेने जात असून राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा येथे हिंसाचार उफाळून आला आहे. सरकार राज्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकलेले नाही. या बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी (10 सप्टेंबर) राज्यात इंटरनेट आणि मोबाईल डेटावर पाच दिवस बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूर सरकारच्या निर्णयानुसार राज्यात 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल डेटा बंद राहणार आहे.
केंद्राने मणिपूरमध्ये CPRF बटालियन तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यात जवळपास 2000 जवान आहेत. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यात राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयश ठरले आहेत, या कारणामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात यावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन ते राजभवनाकडे कूच करत होते.
मणिपूर सरकारने मंगळवारी सायंकाळी एक सुधारित आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने राज्यभरात पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली होती.
Manipur government suspends internet services in state till September 15
Read @ANI Story | https://t.co/uwIFiDSy2o#Manipur #internetservices #ManipurVoilence pic.twitter.com/Acefk34Grt
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2024