अलुवा (केरळ): केरळमधील अलुवा येथील एका २८ वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावर स्वतःबद्दल शोक संदेश पोस्ट करून आत्महत्या केली. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोक संदेश लिहिला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल शेरीफ असे या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (8 डिसेंबर) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अजमलचा मृतदेह घराच्या एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अजमलला चांगली नोकरी मिळत नसल्याने तो थोडासा नैराश्यात होता, असे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रिपोर्टनुसार, अजमलचे इन्स्टाग्रामवर 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी अजमलने इंस्टाग्रामवर “RIP अजमल शेरीफ 1995-2023” या कॅप्शनसह एक फोटो पोस्ट केला होता.