नवी दिल्ली: पंडित धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नालंदा जिल्ह्यातील आकाशने अॅपच्या माध्यमातून ही घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. इंटरपोलच्या मदतीने ही अटक करण्यात आली आहे. बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. धीरेंद्र शास्त्री यांना बिश्नोई टोळीच्या नावाने ई-मेल आला होता. आरोपी आकाश कुमार याने धमकावून 10 लाख रुपयांची मागणी केली होती.
छतरपूर जिल्हा पोलिसांनी बिहारमधील पटना येथील कंकरबाग भागातील द्वारका कॉलेजमधून आरोपीला अटक केली आहे. शनिवारी आरोपीला राजनगर न्यायालयात हजर केले असता तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन-तीन मेल पाठवले होते. एकूण 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.