कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी बुधवारी (24 जानेवारी) कार अपघातात जखमी झाल्या. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
ममता बॅनर्जी यांची गाडी दुसऱ्या वाहनाला धडकू नये म्हणून अचानक थांबवण्यात आली. त्यामुळेच हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना हा अपघात झाला. अचानक बॅनर्जींच्या ताफ्यासमोर दुसरी कार आली आणि त्यांच्या गाडीने लगेच ब्रेक लावला. खराब हवामानामुळे त्या हेलिकॉप्टरने प्रवास करत नव्हत्या.
पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी को सड़क मार्ग से बर्दवान से कोलकाता लौटते समय माथे पर चोट लग गई। मुख्यमंत्री के काफिले के सामने अचानक दूसरी कार आ गई तो उनकी कार ने तुरंत ब्रेक लगा दिया। खराब मौसम के कारण वह हेलीकॉप्टर से सफर नहीं कर रही थीं: सूत्र
(फाइल फोटो) pic.twitter.com/RQLrOi0dP9
— ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2024
दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ममता बॅनर्जी कार अपघातात जखमी झाल्याची बातमी आम्ही नुकतीच ऐकली. आम्ही त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. ते पुढे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी (२५ जानेवारी) सकाळी पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल.
We have just heard of the injury suffered by Mamata Banerjee-ji in a car accident. We wish her a full and speedy recovery.
The Bharat Jodo Nyay Yatra is looking forward to entering West Bengal tomorrow late morning. January 26 and 27th being break days, the Yatra will resume on…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 24, 2024