Earthquake in China : भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी (१८ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. अचानक जमीन हादरल्याने शेकडो इमारतींची पझझड झाली. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत किमान 111 चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 230 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंट नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला. गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं सांगितलं की, भूकंपाची तीव्रता इतकी होती की, शेकडो इमारती पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, गांसू आणि किंघाई प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 230 हून अधिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
युरोपीयन भूमध्य भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून त्याची खोली अंदाजे १० किलोमीटर इतकी होती. भूकंपामुळे चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती कोसळल्यामुले लोकं ढिगाऱ्याखाली दाबायची भीती आहे. त्यांना बाहेर काढण्यात बचाव पथकं व्यस्त असून मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शिन्हुआच्या अहवालानुसार, भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याने चीनचे राष्ट्रीय आपत्ती निवारण, शमन आणि मदत आयोग आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी सक्रिय केली आहे.
मात्र, उंचावरील भाग असल्याने येथे कडाक्याची थंडी असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. आपत्तीच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्थानिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी चीनकडून एक टास्क फोर्स बाधित भागात पाठवण्यात आली आहे. या स्टास्कफोर्सने मंगळवारी पहाटेपासूनच बचावकार्याला वेग दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.