Ladakh Tank Accident : लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी युद्ध सुराव सुरु होता. रणगाडे नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली आणि त्यात अडकून 5 जवानांना प्राण गमवावा लागला.
लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी युद्ध सुराव सुरु होता. रणगाडे नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत. दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. सध्या या भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे.
शुक्रवारी दौलत बेग ओल्डी भागात रणगाड्यांचा अभ्यास सुरु होता. सैन्याचे अनेक टँक्स इथे कार्यरत आहेत. रणगाडे नदीपार करून कसे घेऊन जातात? याचा अभ्यास सुरु होता. एक टँक नदी पार करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक नदीचा प्रवाह वाढला आणि त्यात रणगाडा वाहून गेला. या रणगाड्यात 4 ते 5 जवान होते. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.