नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहाद्रई आणि टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यात सध्या तीन वर्षांचा कुत्रा वादाचे कारण बनला आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेण्याच्या मुद्द्यावरून महुआ आधीच अडचणीत आहे. त्यात आता त्यांचे एक्स पार्टनर जय अनंत देहाद्रई यांनीही या प्रकरणात एंट्री केली आहे. देहाद्रई यांच्या पत्राच्या आधारेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्यावर प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप केला होता.
सध्या रॉटवेलर जातीच्या तीन वर्षांच्या कुत्र्याच्या ताब्यावरुन महुआ आणि देहद्राई यांच्यात वाद सुरू आहे. ‘हेनरी’ असे या रॉटवेलर कुत्र्याचे नाव असून तो सध्या महुआकडे आहे. जय अनंत देहद्राई यांना या कुत्र्याचा ताबा हवा आहे. देहद्राई यांनी शुक्रवारी आरोप केला की, महुआ यांनी कथित ‘प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम’ घेतल्याच्या प्रकरणाची सीबीआयकडे केलेली तक्रार मागे घेतल्यास हेनरीला आपण परत करू, असे सांगितले होते.
जय अनंत देहद्राई काय म्हणाले?
देहद्राई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, मी सीबीआयला माहिती देणार आहे. ते पुढे म्हणाले, ‘मेसेज देणारी व्यक्ती खूप इनोसंट आहे, पण ती स्वतःबद्दल सर्व काही उघड करत आहे.’ महुआ आणि देहद्राई या दोघांनी एकमेकांवर हेनरी चोरल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: