Martyrs Day 2024 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून स्वातंत्र्ययुद्ध जिंकले. त्यांनी असहकार आंदोलन, दांडी मार्च, भारत छोडो आंदोलन आणि सविनय कायदेभंग आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्र केले आणि इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे ते आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि आदर्शाच्या मार्गावर चालत राहिले.
तथापि, ते देश प्रजासत्ताक होताना पाहू शकले नाहीत आणि 30 जानेवारी 1948 रोजी त्यांचे निधन झाले. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दरवर्षी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस देशातील हुतात्म्यांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो. इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहिली जाते.
आज जगभरात महात्मा गांधींना अहिंसेचे प्रतीक मानले जाते. जगभरातील लोक त्यांना प्रेरणास्थान मानतात. शहीद दिनानिमित्त महात्मा गांधींच्या आदर्शांचे स्मरण करण्यासाठी बापूंचे अमूल्य विचार वाचा.
महात्मा गांधीजींचे अनमोल विचार
- आरोग्य ही खरी संपत्ती आहे. सोन्या-चांदीचे मूल्य या तुलनेत काहीच नाही.
- सामर्थ्य हे शारीरिक सामर्थ्याने येत नाही, ते अदम्य इच्छाशक्तीने येते.
- काही करायचेच असेल तर प्रेमाने करा, नाहीतर करू नका.
- डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जग आंधळा करेल
- क्रूरतेला क्रूरतेने प्रत्युत्तर देणे म्हणजे एखाद्याचे नैतिक आणि बौद्धिक पतन स्वीकारणे होय.
- गुलाबाला उपदेशाची गरज नसते, तो फक्त त्याचा सुगंध पसरवतो. सुगंध हा त्याचा संदेश आहे.