लखनऊ : पुण्यात काही दिवसांपूर्वीच एका 26 वर्षीय महिला चार्टर्ड अकाउंटंटचा मृत्यू झाला. याच वर्षी मार्चमध्ये ती EY कंपनीत रुजू झाली आणि जुलैमध्ये तिचा जीव गेला. कामाच्या दबावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यातील घटना ताजी असताना लखनऊमध्ये एचडीएफसी बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे ही घटना घडली आहे.
सदफ फातिमा असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या 45 वर्षांच्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोमतीनगर येथील एचडीएफसी बँकेच्या विभूतीखंड शाखेत फातिमा यांच्याजवळ टीम मॅनेजरचं पद होतं. मंगळवारी सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर ती ट्रॅनिंग सेक्टरमध्ये गेली. तिथे गेल्यावर महिला अधिकारी जेवणासाठी खुर्चीवर बसली असताना अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर ऑफिसमधील सहकर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेला कार्यालयातील वाढता कामाचा ताण कारणीभूत असल्याचे आरोप केले जात आहे.
लखनौच्या या घटनेवरुन सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अखिलेश यांनी लखनौमध्ये कामासाठी दबाव आणि तणाव या कारणामुळे एचडीएफसीच्या एका महिला अधिकाऱ्याची ऑफिसमध्येच खुर्चीवरुन पडून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. अशा बातम्या हे देशातील सध्याच्या आर्थिक दबावाचे प्रतीक असल्याचेही अखिलेश यादव यांनी लिहिले आहे.
यासंदर्भात सर्व कंपन्यांनी आणि अगदी सरकारी विभागांनाही गांभीर्याने विचार करावा लागेल. हे देशाच्या मानव संसाधनाचे कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. अशा आकस्मिक मृत्यूमुळे कामाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असेही यादव यांनी म्हटलं आहे.
लखनऊ में काम के दबाव और तनाव के कारण एचडीएफ़सी की एक महिलाकर्मी की ऑफिस में ही, कुर्सी से गिरकर, मृत्यु का समाचार बेहद चिंतनीय है।
ऐसे समाचार देश में वर्तमान अर्थव्यवस्था के दबाव के प्रतीक हैं। इस संदर्भ में सभी कंपनियों और सरकारी विभागों तक को गंभीरता से सोचना होगा। ये देश के… pic.twitter.com/Xj49E01MSs
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 24, 2024