नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत असे पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पपडणार आहे. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल.
देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा, नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक मतदान, निकाल कधी असणार? याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. तसेच महाराष्ट्रात ५ टप्यात मतदान होईल.
मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस. एस. सिंह आणि ज्ञानेश कुमारही हजर होते. 2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं आहे.
काय म्हणाले निवडणूक आयुक्त ?
देशात एकूण 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक EVM, 1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख, 1.5 कोटी निवडणूक अधिकारी, 18 ते 21 वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा
पहिल्या टप्प्यात -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदार संघाच्या तारखा खालीलप्रमाणे :
7 मे 2024 : बारामती, सोलापूर, सांगली, म्हाडा, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा
13 मे 2024 : पुणे, मावळ, शिरुर
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?
- पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
- दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)
- तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
- चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
- पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )