Priyanka Gandhi : काँग्रेसने तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा असा वादा केला होता. आता तोच वादा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करून पूर्ण केला आहे. “मंत्रिमंडळाने 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सरकारने 10 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 28,000 कोटी रुपयांची शेती कर्जे माफ केली होती असे,” त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
या निर्णयाची माहिती काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी द्विटरवर दिली. तसेच त्या म्हणाल्या कि, त्यांचा पक्ष कायम शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, कि “तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण करत आमच्या तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्जबाजारी 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.”
तेलंगाना में कांग्रेस पार्टी ने किसानों का कर्ज माफ करने का वादा किया था। उस वादे को पूरा करते हुए हमारी तेलंगाना सरकार ने फैसला लिया है कि किसानों के कर्ज माफ किए जाएंगे। इससे कर्ज में डूबे 40 लाख किसानों को राहत मिलेगी।
कांग्रेस मानती है कि देश का सारा धन देश की जनता का है और…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 22, 2024
“देशातील सर्व संपत्ती ही देशातील जनतेची असून ती केवळ लोकांच्या हितासाठीच खर्च झाली पाहिजे, असे काँग्रेसचे मत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्जही आम्ही माफ केले होते. केंद्रात आमचे सरकार असताना देशभरातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. काँग्रेस पक्ष शेतकरी, दलित, कामगार, आदिवासी, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री रेड्डी कर्जमाफीबद्दल म्हणाले की, कर्जमाफी आणि पात्रता अटींचे तपशील लवकरच सरकारी आदेशात प्रकाशित केले जातील. यापूर्वीच्या केसीआरच्या बीआरएस सरकारने 1 लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न केल्याने शेतकरी आणि शेती अडचणीत आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.