नवी दिल्ली: मध्य आणि पूर्व आफ्रिकेतील वाढत्या एमपॉक्स संसर्गाच्या दृष्टिकोनातून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जारी केली आहे. अद्याप या विषाणूविरोधात एकही औषध नसल्याचा दावा केला जात असतानाच यावर प्रभावी औषध संशोधनातून निर्माण केल्याचा दावा केला जात आहे.
लॅक्सेस कंपनीचे रिलाय प्लस ऑन विरकॉन हे जंतुनाशक यापूर्वी ‘मंकीपॉक्स विषाणू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमपॉक्सवर प्रभावी ठरले आहे. हे स्वतंत्र चाचण्यातून सिद्ध झाले असून त्यातून उत्पादनाचा विषाणूविरोधातील प्रभाव सिद्ध झाला आहे. याबाबत लँक्सेसमध्ये हायजीन आणि केअर या बाजार विभागाचे प्रमुख रॉय वान वेल यांनी सांगितले की, संसर्गाचा वेग वाढत असताना परावजीवींचा नायनाट करण्यासाठी प्रभावी निर्जंतुकीकरण करणाऱ्या उत्पादनाची गरज वाढू लागली आहे.
रिलाय प्लस ऑन विरकॉनचा वापर रुग्णालये, आरोग्यसेवा सुविधा, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतूक टर्मिनल्स, क्लिनिक्स, शॉपिंग मॉल्स आणि इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी केला जातो. रिलाय प्लस ऑन विरकॉन हे परावजीवींवर अत्यंत प्रभावी ठरले असून ते धोकादायक ठिकाणी प्रतिबंधाला मदत करते. हे कठीण पृष्ठभागांवर विषाणू अत्यंत प्रभावीरीत्या अकार्यरत करते आणि त्यामुळे प्रसार रोखता येतो.