राजगड: मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एका सब इन्स्पेक्टरच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकरासह उपनिरीक्षकाला तिच्या कारने चिरडले आणि नंतर त्याला 30 मीटरपर्यंत ओढत नेले. राष्ट्रीय महामार्गावर एका महिला कॉन्स्टेबलने खून केल्याची ही घटना घडली आहे. दीपंकर गौतम असे मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे. दीपंकर हे राजगड पोलिस लाईनमध्ये तैनात होते.
उपनिरीक्षकाच्या हत्येचे गुन्हेगार दुसरे तिसरे कोणी नसून पाचोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला कॉन्स्टेबल पल्लवी सोलंकी आणि तिचा प्रियकर करण ठाकूर हे आहेत. महिला कॉन्स्टेबलने लव्ह ट्रँगलमुळे ही घटना घडवली. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिला कॉन्स्टेबलने उपनिरीक्षक दीपंकर गौतमला आपल्या कारने चिरडले, त्यानंतर दोघेही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. ही कार पाचोर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबल पल्लवी सोलंकी यांची होती. गुन्हा केल्यानंतर पल्लवी आणि तिचा साथीदार करण यांनी देहात पोलीस ठाणे गाठले. या दोघांनी पोलिस ठाण्यात खून केल्याची कबुली दिली.
खून करण्यापूर्वी पल्लवी आणि तिचा साथीदार करण यांनी प्रथम उपनिरीक्षक दीपंकर गौतम यांना राष्ट्रीय महामार्गावर काही बहाण्याने बोलावले, त्यानंतर ते जाण्यासाठी दुचाकीवर बसले असता त्यांनी मागून दुचाकीला धडक दिली. दोघांनी दीपंकरच्या दुचाकीला धडक देऊन गाडीखाली चिरडले, त्यानंतर दीपंकरचा मृतदेह दुचाकीसह 30 मीटरपर्यंत ओढून नेला.
गुन्हा केल्यानंतर पल्लवी आणि तिचा साथीदार करण ठाकूर यांनी देहात पोलीस ठाणे गाठले. या संपूर्ण घटनेची माहिती येथे दिली. घटनेची माहिती मिळताच प्रकरण गांभीर्याने घेत एसपी आदित्य मिश्रा आणि अतिरिक्त एसपी आलोक शर्मा यांनी ब्यावरा देहात पोलीस स्टेशन गाठले.
एसपी आदित्य मिश्रा आणि अतिरिक्त एसपी आलोक शर्मा यांनी एसडीओपी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत लेडी कॉन्स्टेबलची चौकशी केली. सुरुवातीच्या चौकशीत असे समोर आले की, पल्लवी आणि करण एकत्र राहत होते, पण नंतर त्यांच्यात काही मुद्द्यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर त्यांच्यातील बोलणे बंद झाले.
यानंतर, ब्यावरा देहात पोलीस ठाण्यात पोस्टिंग झाल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक दीपंकर गौतम आणि महिला कॉन्स्टेबल पल्लवी यांच्यात जवळीक निर्माण झाली. परंतु, नंतर करण पल्लवीच्या आयुष्यात परत आला, त्यानंतर ती पुन्हा त्याच्याशी बोलू लागली. ती बाब दीपंकरला अजिबात आवडली नाही.
नात्यात अडथळा ठरत असलेल्या एसआय दीपंकर गौतम यांना मारण्याची योजना पल्लवीने रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजगडचे एसपी आदित्य मिश्रा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट केले. सध्या तपास सुरू आहे.