Kolkata News : कोलकाता : गेल्या काही दिवसापासून रेल्वे अपघातात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच पश्चिम बंगालमधील बांकुरा परिसरात आज रेल्वेच्या दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. रविवारी सकाळी चार वजेदरम्यान बांकुराजवळ ओडा स्टेशन जवळ हा अपघात झाला.
14 रेल्वे रद्द
मागून येणाऱ्या माल गाडीने समोर चाललेल्या मालगाडीला मागून धडक दिली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. एक मालगाडीचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 14 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर तीन रेल्वे गाडयांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त दोन्ही मालगाडीमध्ये कोणतंही सामान नव्हतं. मात्र त्यांचा अपघात नेमका कसा झाला याच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 14 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, (Kolkata News ) तर तीन रेल्वे गाडयांचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.रेल्वे सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे हा अपघात सिग्नलमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडणीमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. समोर जाणाऱ्या मालगाडीला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. या अपघातामध्ये आठ डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Bribe Case : धानोरी येथील महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला लाच प्रकरणी अटक