कोलकाता : पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज रुग्णालयात 9 ऑगस्टला एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. यानंतर ज्युनियर डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, आता तब्बल 40 दिवसांनंतर या डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. येत्या शनिवारी 21 सप्टेंबरपासून सगळे डॉक्टर कामावर परतणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली. त्यांनंतर काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 20 सप्टेंबरला संप जाहीरपणे मागे घेतला जाईल आणि 21 सप्टेंबरपासून डॉक्टर कामावर परततील.
कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल आणि अन्य दोषी अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवणे आणि रुग्णालयात सुरक्षा उपायांची खात्री करणे असा मुद्दाही डॉक्टरांनी उपस्थित केला होता. मात्र, डॉक्टरांच्या वाढत्या मागण्या आणि डॉक्टरांच्या असंतोषानंतर कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या सरकारने कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
अखेर बऱ्याच चर्चा, बैठकांनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपाययोजनांची खात्री पटल्यानंतर महिन्याभरापासून अधिक काळ सुरू असलेला हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मात्र, तत्पूर्वी आज दुपारी (दि.20) कोलकातामधील स्वास्थ्य भवन ते सीबीआय कार्यालयापर्यंत निषेध आंदोलन करणार आहेत.
#WATCH | Kolkata, West Bengal | Dr Aqeeb says, “On the 41st day of the protest, West Bengal Junior Doctors Front wants to say that we achieved a lot during our agitation, but many things remain unachieved… We made the Kolkata Commissioner of Police resign and the DME, DHS… https://t.co/ESVrACsWF1 pic.twitter.com/doJGiK1Qq3
— ANI (@ANI) September 19, 2024