कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली अन् अक्खा देश हादरला. कोलकाता मधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची निर्दयी घटना घडली आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यात डॉक्टराच्या गुप्तांगासह शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच आरोपीने त्या डॉक्टराची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे देखील नमूद करण्यात आलं आहे. तसेच पीडितेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, हातावर आणि खाजगी भागावर 14 हून अधिक जखमांच्या खुणा आहेत.
समोर आलेल्या अहवालानुसार, पीडितेच्या गुप्तांगामध्ये पांढरा चिकट द्रव पदार्थ आढळला आहे. तर पीडितेला मारहाण केल्यामुळे जास्त प्रमाणात रक्तस्त्राव व फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचीही नोंद अहवालातून समोर आली आहे. तसेच तपासादरम्यान आढळून आलेले रक्त आणि इतर द्रवांचे नमुने पुढील तपास करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेसंदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये सापडला होता. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. नंतर त्याला केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयकडे सोपवण्यात आले. या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाळा हादरा बसला आहे. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली होती.