मुंबई: दक्षिण कुवेतमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत 40 भारतीयांचा मृत्यू झाला. या इमारतीत मजूर राहत होते. खरं तर, दरवर्षी भारतातून लाखो लोक कुवेतसह आखाती देशांमध्ये कामासाठी जातात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथे मिळणारा पगार आहे. साधारणपणे आखाती देशांमध्ये छोट्या कामांसाठी चांगले पैसे मिळतात. कुवेतमधील भारतीय कामगारांच्या संदर्भात विविध नोकऱ्यांच्या किमान वेतनामध्ये जानेवारी 2016 अंतिम सुधारणा करण्यात आली होती. कुवेतस्थित भारतीय दूतावासच्या वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे. खरं तर दुबई, सौदी अरेबिया, कतार, इराण आणि कुवेत यांसारख्या देशांमध्ये भारतीय व्यावसायिक आणि मजुरांना चांगली मागणी आहे, म्हणून दरवर्षी हजारो भारतीय कामासाठी कुवेतला जातात.
कुवेतमध्ये कामगारांना किती पगार मिळतो?
कुवेतमध्ये अकुशल कामगार, मदतनीस आणि सफाई कामगारांना दर महिन्याला 100 कुवेती दिनार मिळतात. भारतीय रुपयात ही रक्कम 27266.38 एवढी आहे. यामध्ये शेती, गाड्या धुणे, बांधकाम, बागकाम आणि इतर मजुरांचा समावेश आहे. त्याचवेळी गॅस कटर, लेथ कामगारांसह अवजड यंत्रसामग्रीसह काम करणाऱ्या मजुरांना 140 ते 170 कुवेती दिनार म्हणजेच 38172.93 ते 46352.85 रुपये प्रति महिना मिळतात.
भारतात कमी वेतन
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अकुशल कामगारांसाठी किमान वेतन वेगळे आहे. इंडिया ब्रीफिंगच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अंदमानमध्ये अकुशल कामगारांची मजुरी 16328 रुपये, आंध्र 13000, अरुणाचल 6600, आसाम 9800, बिहार 10660, चंदीगड 13659 रुपये आहे. एका दृष्टीकोनातून पाहिले तर कुवेतमधील मजुरी भारताच्या दोन ते तीन पट जास्त आहे.
भारतीय रुपयांमध्ये एका कुवैती दिनारची किंमत 272 रुपये आहे, म्हणजेच तुम्ही दर महिन्याला 100 कुवैती दिनार कमावल्यास, रुपयामध्ये ही रक्कम 27200 रुपये आहे. कुवेतमधील कुशल कारागिराचा सरासरी पगार दरमहा अंदाजे 1,260 कुवैती दिनार (अंदाजे 3,43,324.80 रुपये) आहे. कुवेतमधील भारतीयाचा किमान पगार दरमहा अंदाजे 320 कुवैती दिनार (अंदाजे रु 87,193.60) आहे.