Chhattisgarh election 2023: रायपूर: छत्तीसगड विधानसभा निवडणूकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र, त्याआधीच एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करत आहे. सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 41 ते 53 जागा मिळू शकतात. भाजपला 36 ते 48 जागा मिळू शकतात तर इतरांना 04 जागा मिळू शकतात. सी व्होटरच्या मते, काँग्रेसला येथे 43 टक्के मते मिळतील, तर भाजपला 41 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. 16 टक्के मते इतरांना जाताना दिसत आहेत.
छत्तीसगडमध्ये 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 90 जागांवर मतदान झाले आहे. बहुमतासाठी 46 जागांचा जादुई आकडा आवश्यक आहे. यावेळी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये छत्तीसगडमधील 20 नक्षलग्रस्त जागांवर मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.