उत्तराखंड : येथील केदारनाथ मार्गावर दरड कोसळण्याची घटना घड़ली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील भगवान शंकराचे 11 वे ज्योतीर्लिंग श्री केदारनाथ धामकडे जाणा-या पदपथावर दरड कोसळली आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगा-याखाली गाडले गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना समजताच घटनास्थळी बचाव कार्य सुरु करण्यात आले. या घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. ती मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच इतरांचा शोध सुरु आहे.
आज रविवारी (दि.21 जुलै) रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळ्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाला मिळाली. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरु ढिगा-याखाली गाडले गेले. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केले. यावेळी बचाव पथकाने ढिका-यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. तसेच अन्य आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
– नंदन सिंह राजवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी