उत्तर प्रदेश (UP) येथील बलिया जिल्ह्यात एका दुर्घटनेत दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवीन गाडी घेतल्यामुळे पूजा करण्यासाठी सगळे कुटुंब चंदाडीह गावातील मंदिरात गेले होते. मात्र या दुर्घटनेमुळे आनंदाचे रुपांतर दु:खात झाले आहे. माहितीनुसार, रेयांश असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कारच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना एक माकड दिसले असता रेयांश बाहेर डोकावले, दरम्यान, कारची पॉवर विंडो ॲक्टिव्हेट झाली आणि मान विंडोमध्ये अडकली. या दुर्दैवी घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. चकिया गावातील रहिवासी रोशन ठाकूर यांनी या बद्दल माहिती दिली होती.

मुलगा बेशुद्ध होताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी चिमुकल्याला तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली नाही.माहितीनुसार, त्यांचा भाचा रेयांश कारच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना एक माकड दिसले. कारची पॉवर विंडोमध्ये मुलाची मानअडकली कि कोणीतरी खिडकीचे बटण दाबले हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान उभवन पोलिस स्टेशनचे प्रभारी राजेंद्र प्रसाद सिंह यांनी स्वतःहून दखल घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.








