Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पीएमपीएमएल कर्मचाऱ्याला भरधाव कारची जोरदार धडक, शिंदवणे येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 March 2025, 11:06
pmpml-employee-on-his-way-home-after-finishing-duty-hit-by-speeding-car-incident-in-uruli-kanchan

उरुळी कांचन, (पुणे) : पीएमपीएमएलवरील ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी निघालेल्या एका 40 वर्षीय तरुण अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चारचाकी व दुचाकी यांच्यात उरुळी कांचन – जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात मंगळवारी (ता. 11) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

सचिन दिलीप कुंजीर (वय – 40, रा. कुंजीरस्थळ, वाघापूर, ता. पुरंदर) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीएमपीएमएल चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अद्यापही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. तर चारचाकीतील 2 महिला, 2 पुरुष व 5 लहान मुले सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुंजीर हे पीएमपीएमएलवर चालक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे सुट्टी झाल्याने कुंजीर हे उरुळी कांचनवरून राहत असलेल्या वाघापूर या ठिकाणी त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीने निघाले होते. तर जेजुरी या ठिकाणावरून देवदर्शन करून उरुळी कांचनच्या बाजूने एक चारचाकी निघाली होती. यावेळी गाडीत 2 महिला, 2 पुरुष व 5 लहान मुले होती.

शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत आले असता चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या कुंजीर यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कुंजीर हे गंभीर जखमी झाले. यावेळी त्या परिसरात राहणाऱ्या आकाश महाडिक, गणेश शितोळे, अभि महाडिक, ऋषिकेश महाडिक, तुषार शितोळे, यश महाडिक, यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला माहिती देऊन कुंजीर व त्या चारचाकीतील नागरिकांना मदत केली. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या कुंजीर यांना नागरिकांच्या मदतीने उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुंजीर यांच्या डोक्याला, छातीला, मोठी दुखापत झाली असून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

Wednesday, 11 November 2026, 10:57

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Wednesday, 11 November 2026, 10:50

राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा चटका कायम? 11 नोव्हेंबरचा हवामान अंदाज वाचाच

Wednesday, 11 November 2026, 10:31

पहिलाच पाडवा अजितदादांशिवाय! सुनेत्रा पवारांची काळजाला चटका लावणारी पोस्ट; आठवणींनी मन हेलावलं!

Tuesday, 10 November 2026, 18:15
Next Post

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर दोन ट्रकचा भीषण अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp