पुणे: मराठा आरक्षणासाठी राज्यात झालेल्या विविध आंदोलनांत ज्या कार्यकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनांदरम्यान एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण 27.50 कोटी रुपयांची मदत देण्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. या प्रक्रियेत आतापर्यंत मदतीपासून वंचित राहिलेल्या 34 वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3.40 कोटी रुपयांची मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसांना मदत मिळत नसल्याचा मुद्दा लावून धरला होता. दरम्यान, मनोज जरांगे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सरकारने तत्काळ कार्यवाही करून मदतीचा निधी मंजूर केला आहे.

या आर्थिक मदतीचा लाभ मिळणाऱ्या वारसांचा तपशील:
-
बीड जिल्हा: 15 वारस
-
धाराशिव जिल्हा: 5 वारस
-
परभणी जिल्हा: 4 वारस
-
हिंगोली जिल्हा: 4 वारस
-
नांदेड जिल्हा: 3 वारस
-
जालना जिल्हा: 1 वारस
-
छत्रपती संभाजीनगर जिल्हा: 1 वारस
-
लातूर जिल्हा: 1 वारस
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, सरकार दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहे. मराठा समाजाला दिलेली कोणतीही आश्वासने मागे घेण्यात आलेली नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान झालेल्या चर्चेनुसार सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.







