वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या नातीच्या सुरक्षेत झालेली मोठी चूक समोर आली आहे. बायडेन यांच्या नातीच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंटने तीन लोकांवर गोळीबार केला. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन यांची नात नाओमी बायडेन यांच्या एसयूव्हीची काच तीन लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी गोळीबार केला.
एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एपीला सांगितल की, “एजंट नाओमी बायडेन यांच्यासोबत जॉर्जटाउन, वॉशिंग्टन येथे गेले. एसयूव्ही पार्किंगमध्ये उभी होती. यावेळी तीन जण आले आणि त्यांनी काच फोडण्यास सुरुवात केली.
सीक्रेट सर्व्हिसने काय म्हटले?
सिक्रेट सर्व्हिसने एक निवेदन जारी करून सांगितले की, तिघेजण ताबडतोब लाल रंगाच्या कारमधून पळून गेले. सिक्रेट सर्व्हिसने तिघांचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक बुलेटिन जारी केले आहे. केवळ एका सर्व्हिस एजंटने त्यांच्यावर गोळीबार केला होता.