Jaish-e-Mohammed: दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद बाबत मोठी बातमी समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मदने आता त्यांच्या ब्रिगेडमध्ये महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. मसूद अझहरच्या नावाने बुधवारी (8 ऑक्टोबर) ला एक पत्र जारी करण्यात आले. या पत्राद्वारे संघटनेने आपल्या महिला शाखेची स्थापना जाहीर केली. या शाखेचे नाव ‘जमात-अल-मोमिनत’ (Jamaat-al-Mominat) ठेवण्यात आले आहे.

जैशच्या प्रचारक अल-कलाम माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या पत्रात या महिला शाखेची प्रमुख सादिया अझहर असल्याचे सांगितले गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सादिया ही मसूद अझहरची बहीण असून तिचा पती युसूफ अझहर भारताच्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान जैशच्या एका मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला होता.

अधिक माहिती अशी की, मरकझमध्ये शिकणाऱ्या काही गरीब महिलांचा आणि काही दहशतवादी कमांडरांच्या पत्नींचाही या महिला शाखेत समावेश करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जैशच्या घोषणे नंतर सुरक्षा विश्लेषक आणि संबंधित संस्थांकडून या बदलाचा कसा परिणाम होईल याकडे लक्ष लागून आहे.







