नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन आयुष्यात बरेच कामं येऊन पडतात तेव्हा आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुट्टीसाठी अर्ज करत असतो. जसे की आजारी आहे, गावी जायचं, लग्न आहे, फिरायला जायचं किंवा एखादी दुःखद घटना अशी कारणं देऊन आपण रजा मागत असतो. परंतु, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटायचं आहे. असं सांगून कधी कुणी रजा मागितली आहे का? तर हो असा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने ते केलं आहे. त्याने चक्क आपल्याला गर्लफ्रेंडला भेटायला रजा हवी असल्याचं सांगत कंपनीकडे सुट्टीसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर कंपनीने जो रिप्लाय दिला, तो तर भन्नाट असाच आहे.
सुट्टी मागणं म्हणजे ऑफिसमधले हे सर्वात अवघड काम. बर्याचदा खरं कारण सांगून रजा मिळत नाही. मग काय? मग कर्मचारी बरीच खोटी कारणं सांगून रजा घेत असतात. कित्येकांना तर त्यांच्या स्वतःच्या आजारपणातही रजा मिळणं कठीण होऊन बसतं. असं असताना एका कर्मचार्याने गर्लफ्रेंडला भेटायला जायला थेट रजा मागितली आहे. पुढे काय झालं? याचा अंदाज असताना मात्र जे झालं ते अजबच म्हणावं लागेल. तर चला कंपनीने नेमका काय? रिप्लाय दिला आहे तर..
कंपनीने काय पाऊल उचललं?
कर्मचाऱ्याने आपल्या कंपनीकडे तक्रार केली होती की, त्याला डेटवर जायचं आहे, परंतु काम इतकं वाढलं आहे की त्याला त्यासाठी वेळ मिळत नाही. याप्रकरणी व्यवस्थापकाने वेगळ्या पातळीवर कारवाई केली. हे प्रकरण कंपनीपर्यंत पोहोचले आणि एक उपाय सुरू झाला-‘टिंडर लीव्ह’. ही अनोखी रजा कंपनीमध्ये जुलै ते डिसेंबरपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये कर्मचारी कधीही डेटिंगसाठी रजा घेऊ शकतात. यासाठी त्यांना एक आठवडा अगोदर नोटीस द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांचे पैसे कापले जाणार नाहीत.
खर्चही कंपनी उचलणार..
कंपनी व्यवस्थापकांनी अभ्यासाचा हवाला देत सांगितले की, प्रेमात आपल्याला आनंद मिळतो, त्याचा कामावरही सकारात्मक परिणाम होतो. डेटिंगनंतर कामाच्या ठिकाणी येण्यास कर्मचारी आनंदी होईल. यासाठी, कंपनी 6 महिन्यांपर्यंत टिंडर गोल्ड आणि टिंडर प्लॅटिनम सबस्क्रिप्शनचा खर्च देखील उचलणार आहे. या निर्णयानंतर कंपनी सोशल मीडियावर जगभरात प्रसिद्ध झाली आहे.
नेमकी कंपनी कोणती?
हे प्रकरण थायलंडचे असून येथील व्हाईटलाइन ग्रुपच्या मार्केटिंग एजन्सीने हा निर्णय घेतला आहे. काही लोक या व्हाईटलाइन ग्रुपचे हे पाऊल उत्कृष्ट मानत आहेत, तर काहींचे म्हणणं आहे की, कंपनी अशा प्रकारे वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करत आहे.