पुणे प्राईम न्यूज: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अधिकच आक्रमक होत आहे. दरम्यान, इस्रायलने एकाच वेळी सीरियातील दमास्कस आणि अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणमधून येणाऱ्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इस्त्रायली सैन्याने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवर हल्ल्याची पुष्टी केली आहे. स्थानिक मीडिया चॅनल शाम एफएमच्या माहितीनुसार, सीरियन लष्कराने या दोन्ही हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अलेप्पो विमानतळावर इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
#عاجل | وكالة سانا التابعة للنظام: مطارا #دمشق و #حلب خارج الخدمة بعد الهجمات الإسرائيلية
#تلفزيون_سوريا— تلفزيون سوريا (@syr_television) October 12, 2023
सीरियाच्या सरकारी टीव्ही वाहिनीने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास इस्रायली लष्कराने अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट डागले. त्यामुळे विमानतळांच्या धावपट्टीची दुरवस्था झाली आहे. गाझामधील इस्रायलच्या गुन्ह्यांवरून जगाचे लक्ष हटवण्यासाठी हल्ला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.