नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता iPhone 16 सीरीज येत्या काही दिवसांत लाँच होणार आहे. असे जरी असले तरी Apple ने अद्याप 2024 iPhones लाँच करण्याची तारीख जाहीर केली नाही. मात्र, सध्याच्या माहितीवरून असे दिसून आले की आयफोन 16 इव्हेंट लवकरच घेतला जाणार आहे.
iPhone 16 च्या लीक झालेल्या इमेजनुसार, Apple ने बॅक कॅमेरा सेन्सरचा स्पॉट बदलला आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप उभ्या कॅमेरा लेआउटमध्ये दिसू शकतो. Apple नवीन गुलाब रंगामध्ये त्यांचा फोन आणूही शकतो. त्यामुळे पिवळा अर्थात येलो रंग बंद केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी, Apple ने iPhone 16 मॉडेल्समध्ये पंच-होल डिझाइन लाँच केले आणि प्रो मॉडेल्समध्ये ॲक्शन की जोडण्यात आली. यावर्षी कंपनी फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यासाठी कॅप्चर बटण आणण्याची शक्यता आहे. हे झूमिंग फंक्शनमध्ये मदत करू शकते. स्टँडर्ड व्हर्जन आणि iPhone 16 Plus ब्लॅक, ग्रीन, पिंक आणि व्हाईट कलरमध्ये येईल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता युजर्सना या सीरिजकडे लक्ष लागले आहे.