दिल्ली : विमानाने प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने विमान प्रवाशांसाठी विमान प्रवासादरम्यान इंटरनेट सेवा वापरण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रवासी फक्त 3000 मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर वाय-फायद्वारे इंटरनेट सेवा वापरण्यास सक्षम असतील, असे केंद्र सरकारने त्यांच्या अधिसूचनात नवीन नियमांमध्ये या सूचना दिल्या आहे.
केंद्र सरकारने अधिसुचित नवीन नियमांमध्ये या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या या नव्याने अधिसुचित केलेल्या नियमाला फ्लाइट अॅंड मेरीटाइम कनेक्टिव्हिटी (सुधारणा) नियम, 2024 असे म्हटले आहे. आदेशात म्हटले आहे की, उपनियम (1) मध्ये निर्दिष्ट केलेल्या भारतीय हवाई क्षेत्रात किमान उंची असुनही जेव्हा विमानात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्याची परवानगी असेल तेव्हाच वाय-फायद्वारे इंटरनेट सेवा विमानात दिली जाईल.
केंद्र सरकारने उड्डाण आणि सागरी संपर्क नियम 2018च्या अंतर्गत हे आदेश दिले आहेत. विमान 3000 मीटर उंचावर गेल्यानंतर वायफाय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी फक्त भारतीय हवाई क्षेत्रापर्यंतच सीमित आहे. स्थानिक मोबाईल नेटवर्कच्या सोबतच्या हस्तक्षेपापासून दूर राहण्यासाठी केंद्र सरकारने हा नियम आणला आहे.