नवी दिल्ली : चालू वर्षाच्या अखेरीस परदेशातून भारतात अजून १२ ते १४ चित्ते येणार आहेत. सरकारने यासंदर्भातील प्रक्रिया गतिमान केली असून एक शिष्टमंडळ लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस भारतीय अधिकारी आफ्रिकेत जातील.
चित्ते मिळवण्यासाठी केनियासोबत देखील चर्चा सुरू आहे. चित्त्यांचा हा नवा समूह मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात ठेवण्यात येईल. सध्या मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात २४ चित्ते आहेत. यामध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचा समावेश आहे. याशिवाय काही बछड्यांचा भारतात जन्म झाला आहे.