नवी दिल्ली: लोकसभेतील उपाध्यक्षपदावर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून दावा करण्यात येणार असून, वेळ आल्यास त्याकरता मैदानात उतरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या पदावरून लोकसभेत महाभारत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या १० वर्षांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. या वेळी त्या पदावरही काँग्रेसतर्फे दावा सांगण्यात येणार असून, त्याच बरोबर लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळावे, यासाठी इंडिया आघाडी आग्रही राहणार आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षांनाच मिळत आले होते. मागची टर्म मात्र यास अपवाद होती. संसदेचे अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. विरोध पक्षांनी रणनीती ठरवण्यासाठी अद्याप बैठक बोलावलेली नाही. मात्र, ती लवकरच होण्याची शक्यता आहे.