Independence Day 2024 : स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या देशप्रेमींना नमन करण्याचा आजचा दिवस आहे. संपूर्ण देश आज त्यांचा ऋणी आहे. देशभरातील असंख्य महापुरुषांना आज देश नमन करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशभरात आज 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली. ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केल्यावर बोलत होते.
Live: PM Modi addresses nation on 78th Independence Day
Read @ANI Story https://t.co/NtRUjFigSF#PMModiAtRedFort #IndependenceDay2024 pic.twitter.com/TjJOd5Gv2N
— ANI Digital (@ani_digital) August 15, 2024
नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांची चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपली जवळची माणस गमावली आहेत. आज मी त्या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मी त्यांना विश्वासाने सांगतो, हा देश संकटकाळात त्यांच्यासोबत आहे, असं पीएम मोदी म्हणाले.
#IndependenceDay2024 | PM Modi at Red Fort, says, “We are proud that we carry the blood of the 40 crore people who had uprooted the colonial rule from India…Today, we are 140 crore people, if we resolve and move together in one direction, then we can become ‘Viksit Bharat’ by… pic.twitter.com/b5njnZsYLM
— ANI (@ANI) August 15, 2024
“आज आपण 140 कोटी आहोत. जर 40 कोटी भारतीय गुलामीची बेडी तोडू शकतात. 40 कोटी लोक स्वातंत्र्याच स्वप्न पूर्ण करु शकतात, तर 140 कोटी लोक संकल्प घेऊन निघाले, एक दिशा ठरवून निघाले, तर आव्हान कितीही असोत, प्रत्येक आव्हानाला पार करुन समृद्ध भारत बनवू शकतो 2047 साली विकसित भारताचा स्वप्न साकार करु शकतो” असं पीएम मोदी म्हणाले.