Independence Day 2024 : जेव्हा लाल किल्ल्यावरून स्वच्छ मिशनवर बोलले जाते, तेव्हा गावात स्वच्छतेविषयी चर्चा होते. मी समजतो की हे भारतातील चेतनेचे प्रतिक आहे. तीन कोटी कुटुंबांना नळाला पाणी मिळत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत 12 कोटी कुटुंबांना नळाला पाणी मिळत आहे. 15 कोटी कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. गरीब, दलित, शोषित, आदिवासी बांधव या गोष्टी नसताना जगत होते.
आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. त्यानंतर देशाला संबोधित करताना बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आम्ही व्होकल फॉर लोकल हा मंत्र दिला. आज मलाल आनंद आहे की लोकलसाठी व्होकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे. प्रत्येक जिल्ह्याला आपल्या उत्पादनाचा अभिमान वाटू लागला आहे. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळाले पण प्रत्येक सुविधेसाठी लोकांना सरकारकडे हात पसरावे लागले होते. मात्र आज सरकार घरोघरी नळाचे पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.
#IndependenceDay2024 | From the ramparts of Red Fort, PM Modi says, “For Viksit Bharat 2047, we invited suggestions from the countrymen. The many suggestions we received reflect the dreams and aspirations of our citizens. Some people suggested making India the skill capital, some… pic.twitter.com/3bmoDqcVid
— ANI (@ANI) August 15, 2024
“2047 पर्यंत विकसित भारताच स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सुचवल्या आहेत. माझ्या देशवासियांनी हे सुचवलं आहे, म्हणून मी ते वाचलं. देशवासियांची इतकी मोठी स्वप्न आहेत. देशवासियांचा हा विश्वास अनुभवातून आला आहे. लाल किल्ल्यावरुन देशातील 18 हजार गावात वीज पोहोचणार असं सांगितलं जातं आणि वीज तिथे पोहोचते त्यावेळी विश्वास दृढ होतो” असं पीएम मोदी म्हणाले.