Independence Day 2024 : मेडीकल शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. आता 10 वर्षात मेडिकलच्या जागांची संख्या 1 लाख झाली आहे. दरवर्षी 25 हजार युवांना मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. 2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
#WATCH | During his #IndependenceDay2024 speech, PM Modi announces, “In the next five years, 75,000 new seats will be created in medical colleges in India. Viksit Bharat 2047 should also be ‘Swasth Bharat’ and for this, we have started Rashtriya Poshan Mission.” pic.twitter.com/IvVLVYPGKK
— ANI (@ANI) August 15, 2024
आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. त्यानंतर देशाला संबोधित करताना बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, अंतराळ क्षेत्रातही आपण आज अनेक बदल झाले आहेत. अंतराळ क्षेत्र हे आपल्या भविष्याशी जोडलेले आहे. अंतराळ क्षेत्र अनेक बंधनांनी जखडलेले होते. आता हेच बंधन मुक्त करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स येत आहेत. अंतराळ क्षेत्र हे भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आज प्रायव्हेट सॅटेलाईट्स, रॉकेट्स लॉन्च होत आहेत. नीती, धोरण योग्य असेल तर तसेच संपूर्ण समर्पणाची तयारी असेल तर योग्य परिणाम दिसून येतात.
#IndependenceDay2024 | PM Modi says, “In last 10 years, 10 crore women joined women self-help groups. 10 crore women are becoming financially independent. When women become financially independent they become part of the decision-making system in a household leading to social… pic.twitter.com/lmbsuZ84ut
— ANI (@ANI) August 15, 2024
मागील 10 वर्षांमध्ये जवळपास 10 कोटी महिलांनी स्वयंसहायता गटात सहभागी होत या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. ज्यावेळी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात ज्यावेळी त्या निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेचा भाग होतात. कुटुंबाला पुढं नेणाऱ्या या बदलांचा हातभाग सामाजिक बदलांमध्येही दिसून येतो असं म्हणत पंतप्रधनांनी देशातील महिला वर्गाची प्रगती अधोरेखित केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.