Covid 19 Update : कोरोनानं देशात पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोविड १९ चे ६४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या २९९७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत साडेचार कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोना मृत्यूची एकूण संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८१ टक्के आहे. तर मृत्यूदर १.१९ टक्के आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, समांतर अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
राज्याचं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
राज्यात बुधवारी सिंधुदुर्गमध्ये कोविड-19 सब-व्हेरियंट JN.1 च्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात दरोरोज ५०० जणांची करोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यांना दररोज कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याच्या अपेक्षेने दररोज चाचणी वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.