पुणे : राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै – ऑगस्ट या महिन्यांच्या तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. या योजनेची चर्चा देशभर सुरु आहे. आता कर्नाटक राज्यातील ‘गृहलक्ष्मी योजने’चीही चर्चा तितकीच सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या महिलांना प्रतिमहिना 2000 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेचे पैसे बँक खात्यावर येताच तेथील एका महिलेने थेट संपूर्ण गावाला पुरवणपोळीचं जेवण दिलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही गृहलक्ष्मी योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गृहिणींना प्रतिमहिना दोन हजार रुपये दिले जात आहेत.
रायबाग तालुक्यातील सुतट्टी गावातील अक्काताई लंगोटी यांना देखील या योजनेमार्फत दोन हजार रुपये खात्यावर जमा झाले आहे. या योजनेचे 2000 रुपये मिळताच त्यांनी संपूर्ण गावालाच पुरणपोळीचं जेवण दिलं आहे. कर्नाटकातील या महिलेने केलेल्या कामाचे सगळीकडे चर्चा सुरु आहे.
तसेच या महिलेने पुरणपोळीचं जेवणं खाऊ घालून सुवासिनींची ओटी भरून काही महिलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत. या महिलेने गावातील मंदिरात पूजाअर्चा देखील केली आहे. त्यामुळेच सध्या या महिलेची आणि गृहलक्ष्मी योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे.