Employees Harassment: केरळ येथील हिंदुस्तान पॉवरलिंक्स या मार्केटिंग फर्ममध्ये कर्मचाऱ्यांवरिल अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकारी त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अमानुष आणि क्रूर शिक्षा देतात. कर्मचाऱ्यांना कुत्र्याचा पट्टा घालण्यास, जमिनीवरून पाणी चाटून पिण्यास आणि कुजलेली फळे खाण्यास भाग पाडले जात असल्याचा धक्क्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनावर कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा लाजीरवाणा प्रकार केल्याचे समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अहवालांनुसार, कर्मचाऱ्यांना, जे बहुतेक मार्केटिंग प्रतिनिधी आहेत, जर ते त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाले तर त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत आहे. कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपमान आणि भीतीचा वापर करतात असा आरोप आहे.
अनेक कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध बोलण्यास घाबरतात, कारण त्यांना अपमानाची भीती वाटते. कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दरमहा ₹6,000 ते ₹8,000 पगार देते, जर त्यांनी त्यांचे लक्ष्य पूर्ण केले तर पदोन्नती आणि जास्त पगार देण्याचे आश्वासन देते. हिंदुस्तान पॉवरलिंक्सवर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, कर्मचाऱ्यांचा छळ आणि शोषण केल्याचा आरोप आणि कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करून दावा केला आहे की, कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी असे करण्यात आले होते. तथापि, छळ आणि गैरवर्तनाच्या आरोपांमुळे व्यापक संताप निर्माण झाला आहे, अनेकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.