दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ग्रॅंड-कॉलरा ऑफ द ऑर्डर तिमोर-लेस्टे’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या मुक्कामावर शनिवारी दक्षिण-पूर्व आशियातील तिमोर-लेस्टे येथे पोहोचल्या. तिमोर-लेस्टेची राजधानी दिल्ली येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
राष्ट्रपती सचिवालयाद्वारे चालवल्या जाणा-या राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत अकाउंटवरुन पोस्ट शेअर करताना लिहिले, “तिमोर-लेस्टेचे राष्ट्रपती जोस रामोस-होर्टा यांनी ‘ग्रॅंड-कॉलरा ऑफ द ऑर्डर तिमोर-लेस्टे’ यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान कला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुरस्कार. “सार्वजनिक सेवा आणि शिक्षण, समाजकल्याण आणि महिला सशक्तीतकरणासाठी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे,” असे पोस्टमध्ये लिहिले आहे.
President José Ramos-Horta of Timor-Leste conferred the Grand-Collar of the Order of Timor-Leste, the country’s highest civilian award, upon President Droupadi Murmu. The award is in recognition of her achievements in public service and dedication to education, social welfare and… pic.twitter.com/V7YmnW7Jiu
— President of India (@rashtrapatibhvn) August 10, 2024
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, हा सन्मान भारत आणि तिमोर-लेस्टे यांच्यातील मैत्रीचे प्रतिबिंब आहे. याआधी त्यांनी न्यूझीलंड आणि फिजीला भेट दिली होती. विशेष म्हणजे, भारताची दक्षिणपूर्व आशियात तरुण राष्ट्रापर्यंतचा पहिलाच राष्ट्रपतींचा दौरा आहे. तिमोर-लेस्टेला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आला.
“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिमोर-लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस-होर्टा यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही लोकशाहींमधील मजबूत संबंधांवर अधोरेखित करताना, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधींवर प्रकाश टाकला,” त्यांच्या कार्यालयाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये चर्चा केली. “