बेंगळुरु : नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि मैत्री या गोष्टींचं असणं खूप महत्वाचं असतं. हे घटक वगळता एखाद नातं जास्त वेळ तग धरून राहू शकत नाही. शिवाय या नात्यामध्ये संशयाला जागा कधी नसावी. कारण नात्यातील संशय दोघांचे आयुष्य शेवटाकडे घेऊन जात असतो. असाच एक प्रकार बेंगळूरुमध्ये घडल्याचे समोर आले आहे.
बेंगळुरूमध्ये 28 वर्षीय डान्स इन्स्ट्रक्टरची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी नवश्री नावाच्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. नवश्रीचा मृत्यू तिच्या बालपणीची मैत्रिण ऐश्वर्याला सर्वात आधी आढळला, जी तिच्यासोबत होती. ऐश्वर्याने सांगितले की, सकाळी ६ वाजता तिला जाग आली तेव्हा तिने पाहिले की नवश्री रक्ताने माखलेली होती आणि ऐश्वर्या स्वतःही रक्ताने माखलेली होती.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय..
घटनेच्या काही तासांनंतर, बेंगळुरू पोलिसांनी नवश्रीचा नवरा किरणला अटक केली, जो व्यवसायाने कॅब ड्रायव्हर आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की किरणला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. या संशयामुळे किरणने म्हणजेच तिच्या नवऱ्याने तिची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवश्रीने घटनेच्या आदल्या दिवशी सकाळी तिची मैत्रिण ऐश्वर्या हिला फोन केला आणि तिला एकटीला सुरक्षित वाटत नसल्याचे तिला सांगितले. यानंतर दोन्ही मैत्रिणी संध्याकाळी भेटल्या. त्यानंतर नवश्रीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्या आणि त्यांचा आणखी एक मित्र अनिलसोबत ते बाहेर गेले.
अनिलने नवश्रीला पोलिसात तक्रार नोंदवण्याची सूचना केली, मात्र त्यावेळी नवश्रीने इतकं टोकाचं पाऊल उचलले नाही आणि ती तिथेच थांबली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ऐश्वर्याला नवश्री मृत अवस्थेत दिसली तेव्हा तिने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे शेजारी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.