दिल्ली : एका हत्या प्रकरणात हायकोर्टाने १०४ वर्षीय व्यक्तीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रसिक चंद्र मंडल असं जमीन मंजूर करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. १९८८ मध्ये एका खुनाच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या मंडलची आता सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ट्रायल कोर्टाच्या अटींच्या आधारे तात्पुरती सुटका करण्यात येणार आहे.
रसिकचंद्र मंडलने १९९४ मध्ये हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्याने अनेकवेळा आपल्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने मंडलला दिलासा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
१९२० रसिक चंद्र मंडलचा जन्म पश्चिम बंगालमधली मालदा जिल्ह्यातील एका अज्ञात गावात झाला आहे. त्याच वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले होते. मंडलला १९९४ मध्ये १९८८ मधल्या एका हत्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यावेळी तो ६८ वर्षांचा होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आजारांमुळे त्याला तुरुंगातून पश्चिम बंगालमधील बालूरघाट येथील सुधारगृहात हलवण्यात आले.
२०१८ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेविरुद्ध त्याने केलेले अपील फेटाळले होते. मंडलने पुन्हा २०२२ मध्ये शंभरी ओलांडण्यासाठी एक वर्ष बाकी असताना सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. वृद्धापकाळ आणि संबंधित आजारांचे कारण देत त्याने मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. पॅरोल किंवा शिक्षा माफीसाठी पात्र होण्यासाठी १४ वर्षे तुरुंगात घालवण्याच्या निकषातन सुट देण्याची मागणीही केली होती.