Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज (8 ऑक्टोबर) निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हरियाणातील 90 जागांसाठी 464 अपक्ष आणि 101 महिलांसह एकूण 1,031 उमेदवार रिंगणात आहेत. सध्याचे कौल पाहता हरियाणामध्ये कॉंग्रेस पिछाडीवर पडले आहे तर भाजपने 50 आकडा गाठला आहे. कॉंग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे.
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. हरियाणामध्ये सत्ता आल्यास भाजपने मला मुख्यमंत्री करावे अशी मागणी करणारे गृहमंत्री अनिल विज अंबाला कॅंट मतदारसंघातून सध्या पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सकाळपासून जुलाना मतदारसंघातून आघाडीवर असलेल्या विनेश फोगट आता मागे पडल्या आहेत. हरियाणातील अनिल विजही मागे आहेत. लाडवा मतदारसंघातून नायब सिंह आघाडीवर आहेत. हिसारमधून सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. तोशाम मतदारसंघातून भाजपच्या श्रुती चौधरी आघाडीवर आहेत.
हरियाणातील ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकलाची स्पर्धा दिसून येत आहे. भाजपाने हरियाणात जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेस पिछाडीवर गेलं आहे. हरियाणातील ट्रेंडमध्ये मोठा उलथापालथ होताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे.