Good News नवी दिल्ली : भारताशेजारील देशात बायरोड अर्थात रस्त्याने वाहन घेऊन जाता येणे हे सहज शक्य होऊ शकतं. (Good News ) मात्र, आता भारतातून बँकॉकला बायरोड जाता येणार आहे. (Good News) यासाठी महामार्गाचे बांधकाम केले जात आहे. (Good News) त्यानुसार, येत्या 4 वर्षांमध्ये हे काम पूर्ण होऊन भारत-बँकॉक हा प्रवास खासगी वाहनाच्याद्वारे करता येणार आहे. (Good News)
भारतातील अनेक नागरिक बँकॉक आणि मलेशियाला पर्यटनासाठी पसंती देताना दिसत आहे. पण या सर्व पर्यटकांना बँकॉकला जाण्यासाठी विमान प्रवासाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, आता विमानाशिवाय म्हणजे खासगी वाहनानेही या ठिकाणी जाता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी येत्या चार वर्षांमध्ये भारतातून बँकॉकला जाण्यासाठी महामार्गाचं बांधकाम केले जात आहे.
महामार्गाचे काम युद्धपातळीवर
भारत-बँकॉक या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या महामार्गाचे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांना बँकॉकला जाण्यासाठी विमान प्रवासावर अवलंबून राहावं लागणार नाही.
तीन देशांना जोडणार रस्ता
भारत, म्यानमार आणि बँकॉक या तीन देशांना हा महामार्ग जोडणार आहे. भारतातून हा महामार्ग कोलकाताहून सुरू होईल. कोलकातापासून सिलिगुडी, श्रीरामपूर, गुवाहाटी, कोहिमा आणि मोरेह मार्गे म्यानमारमध्ये जाईल. तेथून तामूमार्गे कलेवा, मंडाले आणि यांगॉनवरून थायलंडला जोडला जाईल. थायलंडमध्ये मई सॉट आणि सुखोथाईवरून तो बँकॉकपर्यंत जाईल.
2800 किमी लांबीचा महामार्ग
भारत-बँकॉक या महामार्गाची एकूण लांबी तब्बल 2800 किमी इतकी असणार आहे. या मार्गाचा सर्वात मोठा हिस्सा हा भारताच्या हद्दीत असेल, तर सर्वात कमी हिस्सा थायलंडमध्ये असणार आहे.