पणजी: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अबुधाबीहून आलेल्या तीन प्रवाशांची तपासणी करत 5.7 किलो सोने व 29 प्रो मॅक्स आयफोन मिळून 3.92 कोटी रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
गोव्यातील मोपा विमानतळ 11 डिसेंबर रोजी खुले करण्यात आले, त्यानंतर या विमानतळावर झालेली तस्करीची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. अबुधाबीहून आलेल्या तीन प्रवाशांनी पेस्टच्या स्वरुपात हे सोने आणले होते. परंतु, महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही तस्करी सुटली नाही. गुजरात बाला पटेल ऊर्फ मोहम्मद गुलाम नबी (37., रा. गुजरात), कामरान अहमद खान (38, रा. मुंबई) व इरफान (30, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.