Gold Silver Rate Today : नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातदेखील मौल्यवान धातूच्या किंमती उतरल्या. गेल्या सात दिवसांत सोने 1,200 रुपयांनी तर चांदी 2,500 रुपयांनी स्वस्त झाली.
3 जानेवारीपासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरु आहे. या आठवड्यातही पडझड सुरु होती. पण चांदीने अचानक झेप घेतली. चांदीत किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली. गेल्या सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरले आहे. किंमती घसरल्याने ग्राहकांचे पाय सराफा बाजाराकडे वळले आहेत. आता सोने-चांदीची अशी आहे किंमत
सोन्याने दिली आनंदवार्ता
आज 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुडरिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. डिसेंबरमध्ये उच्चांकी झेप घेणाऱ्या सोन्याने जानेवारीच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारी सोने 200 रुपयांनी घसरले. 4 जानेवारी 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारीला सोने 130 रुपयांनी घसरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला शंभर रुपयांनी किंमत कमी झाली.
चांदीचा भाव
गुडरिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, आज एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे. चांदीत या वर्षाच्या सुरुवातीला घसरण दिसून आली. 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली होती. 4 जानेवारीला चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली होती. 8 जानेवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. 9 जानेवारी किंमत तितकीच राहिली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. गुडरिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, सोन्याच्या किंमती वधारल्या. तर चांदी पण महागली आहे. 24 कॅरेट सोने 62,415 रुपये, 23 कॅरेट 62,165 रुपये, 22 कॅरेट सोने 57172 रुपये झाले. 18 कॅरेट 46,811 रुपये, 14 कॅरेट सोने 36,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. आज एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे. 10 January 2024