Gold Rate: भारतात सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. 21 एप्रिल रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,570 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,440 रुपये, आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,180 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,757 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,318 रुपये आहे. चांदीचे दर पहिले तर चांदीच्या किमतीतही घसरण झाल्याने सध्याचे दर प्रति ग्रॅम ₹99.90 असून प्रति किलोग्राम ₹99,900 इतके आहेत.
सोने आणि चांदीच्या किमतीत होणारी घसरण सुरूच राहण्याची अपेक्षा आहे आणि गुंतवणूकदारांना बाजारातील ट्रेंडवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मागील दिवसाच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत, २४ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम १० रुपयांची घट, २२ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम १० रुपयांची घट, १८ कॅरेट सोने: प्रति १० ग्रॅम १० रुपयांची घट, काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 100 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,00,000 रुपये होता. दरम्यान, चांदीत प्रति किलोग्रॅम १०० रुपयांनी घट झाली आहे. बाजार अस्थिर राहण्याची शक्यता असून सोन्या-चांदीच्या दरात अशीच चढ-उतार पाहायला मिळणार आहे.